पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोजागिरीच्या निमित्ताने (Sagargad Part 2) ....

इमेज
आजवर कोणतेच मिशन अर्धवट केलेलं नाही. काही ना काही मार्ग निघतोच. याच आव्हानांनी बऱ्याच गोष्टी शिकवल्या. त्याचा उपयोग खऱ्या आयुष्यात, प्रोफेशनल आयुष्यात बऱ्याच वेळा झाला. आता पुन्हा तीच वेळ येऊन धडकली होती. निर्णय घ्यायचा होता. चढणीवर बाईक घालण्यात अर्थ नव्हता. साहस करावे, मूर्खपणा करू नये. याच मूर्खपणा पायी अनेकांनी नाहक जीव गमावले आणि आमचे अनेक डोंगर, किल्ले उगाच बदनाम झाले आहेत.   आलो तीच TECHNIQUE  वापरून चिखलवाट पार केली. रस्त्याकडेला पहिलं घर लागेल तिथे विचारपूस करायचं ठरलं. काहीच अंतरावर २ गावकरी दिसले आणि हायसं वाटलं. विचारपूस केल्यावर कळलं की जिथे आम्ही उभे होतो तिथूनच सागरगडचा ट्रेक सुरु होतो. परंतु, बाईक लावायला योग्य जागा बघा अन्यथा पेट्रोल चोरी होईल असं बोलून ते गडाच्या दिशेने निघाले. आता पुन्हा एक पंचाईत. अखेरीस पुढे कुंपणाच्या आत एका घरात पराग आणि वेदांत चौकशी करण्यासाठी गेले, ते घरमालकाला घेऊनच सोबत आले. त्या काकांनी अगदी अदबीने कुंपणावरचे बांबू बाजूस करून आम्हाला व बाइक्सना घराच्या अंगणात थारा दिला. उरण पासूनची रपेट आणि दगडधोंड्यातून कसरत करून आमचे पार अवसान गळाले होते.