पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तांदुळवाडीवरचा बार्बेक्यू

इमेज
ठरलेल्या ट्रेनने आणि ठरलेल्या वेळी सफ़ाळेला सर्वांची गाठभेट झाली. स्टेशन परिसरांत योग्य त्या जिन्नसा घेऊन आमची १० जणांची तुकडी पाटील दादांच्या जीप जवळ आलो. जून महिन्यांतला पाहिला शनिवार आणि कलतीचं  उन असल्याने वातावरणांत उकाडा जाणवत होता. ७-८ किमीचं अंतर असलं तरी फक्त ५ मिनिटांत तांदुळवाडी येईल, असं बोलून पाटीलभाऊंनी आधीच्या पॅसेंजरांसोबत आम्हाला कसंबसं कोंबून बसवलं. १५-२० मिनिटांचा तो प्रवास चांगलाच कसरतीचा पण तितकाच गंमतीचाही झाला. तांदुळवाडी गावात पोहोचल्यावर 'मुख्य जिन्नस' घेण्यासाठी परत अर्धा किमी मागे जावं लागलं, त्यात आणखी अर्धा तास गेला. गावातल्या दिलीपभाऊंच्या घरातून यथायोग्य पाण्याची कुमक घेऊन आमची तुकडी संध्याकाळी ६.४५ वाजता दुर्ग चढणीच्या वाटेस लागली. गावातून दिसणारा तांदुळवाडीचा डोंगर तांदुळवाडीच्या वाटेवर  १० मिनिटांतच खडा चढ सुरु झाला आणि शरीरासोबत मानसिकतेचा कस लागणार याची जाणीव झाली. कारण ग्रुपमधील सारेच जण आज बऱ्याच दिवसांनी ट्रेकला आले होते. त्यात उकाड्याचे दिवस, सोबत CAMPING च्या उद्देश्याने सामान व पाण्याचेही वजन होते. आता सूर्य मावळून अं

'असावा' सुंदर...

इमेज
 पालघर, बोईसर ही शहरे उद्योगांनी गजबजलेली; परंतु दुसऱ्या बाजूने नैसर्गिक समृद्धीने ल्यालेली आहेत. छोटेखानी असावा नावाचा किल्ला त्याच डोंगररांगेतील रत्न. काळदुर्ग आणि अशेरीगड यांच्या बरॊबर मधोमध बोईसर शहरावर नजर राखून असावा उभा आहे. फारसा परिचित नसला तरी इथला ट्रेक अगदी आल्हाददायक आहे.  पालघरमधील सारेच किल्ले तसे दुर्लक्षित, पण प्राचीन काळी त्यांचे महत्व फार होते. सध्याच्या घडीला मुंबईपासून जवळच आणि तद्दन गर्दीपासून दूर असल्यामुळे एक दिवसाच्या ट्रेक साठी अतिउत्तम. यांच्या गडमाथ्यावरचे नजारे फारच सुंदर आहेत, दूरवरचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. लोकल ट्रेनमुळे बोईसरला पोहोचणे बरेच सोपे झाले आहे. बोईसर स्टेशनच्या बाजूलाच असलेल्या बोईसर रिफ्रेशमेंटमध्ये नाष्टा आटोपून आम्ही सवारीच्या शोधात निघालो. सुदैवाने टमटमवाले एक काका त्याचवेळी वसईच्या दिशेने गाडीच्या काही कामासाठी निघाले होते. त्यांनी अगदी माफक दरांत गंतव्य स्थानी पोहोचवले. अन्यथा स्टेशनवरून टमटम वा हायवेच्या दिशेने जाणाऱ्या कोणत्याही ST ने वारंगडे गावांत उतरावे. तिथे असलेल्या विराज फॅक्टरीच्या बाजूने असावाचा ट्रेक सुरु होतो. १०

कामनची कमाई

इमेज
थोड्याशा विलंबानेच गाडी धावत होती. वसईलाच मस्त इडली वड्याचा नाष्टा झाल्यामुळे सगळ्यांचे पोटोबा प्रसन्न होते. परंतु संपूर्ण भिवंडी दर्शन करूनही कामनचा पायथा काही येत नव्हता, म्हणून सगळ्यांचे GOOGLE MAPS चालू झाले होते. जुन महिन्याचा शेवटचा आठवडा असूनही म्हणावी तशी पावसाला सुरुवात झाली नव्हती. तुंगारेश्वर जंगलास संपूर्ण वळसा घालून अखेरीस आम्ही कुहे गावांत पोहोचलो. एवढी मोठी गाडी घेऊन हे शहरांतले लोक इथे कशाला तडमडायला आलेत, याच अविर्भावात गावातली लोक आमच्याकडे पाहत होती. गडाच्या कमी प्रचलित बाजूने आम्ही जाणार असल्याने या मार्गाने सहसा कोणी येत नाही. डांबरी रास्ता जिथे संपतो तिथल्या झाडाकडे गाडी लावली. आधीच उशीर झाला असल्यामुळे घाईत ओळख परेड संपवली.  डोंगरपल्याड कामन दुर्ग आणि ट्रेकपूर्वीचे क्षण     पाठीशी सॅक मारून पुन्हा गावाच्या मध्यभागी आलो. गावकरी गोट्याला OFFICIAL GUIDE ठरवून पुढचं मार्गक्रमण करायचं ठरलं. त्याने सोबत १ आणि पुढे गेल्यावर आणखी २ असं ३ जणांना हाताशी घेतलं. स्लीपर्स घालून लीड करणाऱ्या ह्या लीडर्स पाठोपाठ 'बऱ्यापैकी' ब्रँडेड शूज घालणाऱ्या आमच्या २३ जण

सर्वांग सुंदर... पालघर

इमेज
मुंबई, ठाण्यातल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनांतून काहीसा विरंगुळ्याचा, निवांत क्षण काढायचा असेल तर प्रसिद्ध आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्यापेक्षा जवळच्याच आणि त्याहीपेक्षा सुंदर ठिकाणी जायला कोणाला आवडणार नाही, त्यातही काही नवे अनुभवायला मिळत असेल तर... कोकणांतल्या इतर जिल्ह्याप्रमाणेच पालघर जिल्हा सुद्धा निसर्गाच्या आशीर्वादाने भरपूर पावेता झालेला आहे. हिरे माणके पेरावेत, त्याप्रमाणे निसर्गाचं कोंदण या जिल्ह्याला लाभलं आहे. एका बाजूला मोठमोठाले डोंगर, वळणदार नद्या, छोटछोटी गावं, आदिवासी पाडे, जंगलांचा भाग तर दुसऱ्या बाजूला समुद्राची गाज.  निसर्गाच्या भौगोलिक देणगीमुळेच भारतातला पहिला आण्विक ऊर्जा प्रकल्प पालघरमधील तारापूर मध्ये स्थापित झाला. सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असा नामाभिमान मिरवणारी तारापूर MIDC ही सुद्धा इथलीच.  निसर्ग आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम केवळ याच जिल्ह्यात पाहावयास मिळतो. बोईसरमधील चिंचणी बीच वरून दिसणारे तारापूर ऊर्जा  प्रकल्पाचे  टॉवर्स पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम लोकल यामुळे इथला प्रवास बऱ्यापैकी सोपा झाला आहे. मुंबईला लागूनच असल्यामुळे अ