पोस्ट्स

जून, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सुधागडावरील अमृतानुभव

इमेज
पालीच्या बल्लाळेश्वराचा टिळा कपाळी लावून सुधागडाच्या पायथ्याशी असणाऱ्या दर्या गावात पोहोचलो. नियोजित वेळ चुकल्यामुळे गावातच पिठलं भाकरी खाऊन दुपारी ३.३० वाजता गड चढाईला प्रारंभ केला. ऊन आणि दमट  वातावरणामुळे पुरतीच वाट लागली. कशाबशा दोन शिडया पार झाल्या आणि समोर सरबत विकणाऱ्या ताईला पाहून स्वर्ग गवसल्यासारखं वाटून गेलं. दिवसभरात एकही सरबत न विकलेल्या ताईकडे ग्रुपमधील शेवटचा ट्रेकर येईपर्यंत सगळा स्टॉक संपलादेखील, पाणी आणि पिळलेले लिंबू सुद्धा उरले नाहीत. फक्त १४ जण होतो आम्ही.  कातळाला तासून बनविलेला चिलखती बुरुज  पहिला चिलखती बुरुज पार करेपर्यंत सूर्य क्षितिजाकडे झेपावला होता आणि गडमाथ्यावर पोहोचेपर्यंत काळोखाचे साम्राज्य पसरले होते. आता चढाई जरी नसली तरी सुधागडवरच्या विस्तीर्ण पठारावरून पंतसचिवांचा वाडा गाठणं, एक आव्हानच होतं. पण इथेच खरा अनुभव पणाला लावत आणि नवीन ट्रेकर्सना NIGHT TREK चा थरारक  अनुभव देत, वाड्यावर पोहोचतं केलं. ट्रेकच्या सुरुवातीलाच थकलेले असले तरी सर्वांनी काळोख्या ट्रेकिंगमध्ये मात्र कमालीची उत्स्फूर्तता दाखविली....  मग वाड्याची साफ-सफाई पासून टेन्ट लावण्यापर्यंत