पोस्ट्स

साद सह्याद्रीची... निसर्गाची

इमेज
सह्याद्रीतली सफर म्हणजे अनुभवांची खूप मोठी पोतडी. सारं काही शिकवतो सह्याद्री, निसर्गाची अनेक रूपं दाखवतो सह्याद्री. निसर्गाने अगदी भरभरून सह्याद्रीवर मुक्तहस्ते उधळण केलेली आहे. बर्फाच्छादित शिखरे सोडली तर माझ्या सह्याद्रीत नाही असं काहीच नसावं... पश्चिमेकडे समुद्र, डोंगरांची रांग, त्यांच्या उदरात उगम पावून वळणदार प्रवास करणाऱ्या नद्या, उत्तुंग शिखरे, खोल दऱ्या, ताशीव कडे, घनदाट जंगलातून गडप होणारे घाटरस्ते आणि दागिन्यात मढवलेल्या मोत्यांप्रमाणे दिसणारे त्यावरील किल्ले हे सारं सारं सह्याद्रीची आणि या साऱ्या भूप्रदेशाची शान आहे. कोणत्याही मोसमात सह्याद्री आपल्याला भरभरूनच देतो. पावसाळ्यात तर या साऱ्याला बहर आलेला असतो. या दिवसांत उत्तुंग कड्यांवरून दरींत झेप घेणारे धबधबे म्हणजे प्रसन्न निसर्गाची जणू साक्षच! बरं, हा सह्याद्रीचा भाग म्हणजे केवळ कोकण किनारपट्टी किंवा घाटमाथा नव्हे, तर ही सारी महाराष्ट्रभूमी. अंधारबन - सह्याद्रीचे प्रातिनिधिक उदाहरण...  नैसर्गिक विविधतेचा खजिना  जगातल्या १० BIO-DIVERSITY  HOTSPOT पैकी एक ...