साद सह्याद्रीची... निसर्गाची
सारं काही शिकवतो सह्याद्री, निसर्गाची अनेक रूपं दाखवतो सह्याद्री.
निसर्गाने अगदी भरभरून सह्याद्रीवर मुक्तहस्ते उधळण केलेली आहे. बर्फाच्छादित शिखरे सोडली तर माझ्या सह्याद्रीत नाही असं काहीच नसावं... पश्चिमेकडे समुद्र, डोंगरांची रांग, त्यांच्या उदरात उगम पावून वळणदार प्रवास करणाऱ्या नद्या, उत्तुंग शिखरे, खोल दऱ्या, ताशीव कडे, घनदाट जंगलातून गडप होणारे घाटरस्ते आणि दागिन्यात मढवलेल्या मोत्यांप्रमाणे दिसणारे त्यावरील किल्ले हे सारं सारं सह्याद्रीची आणि या साऱ्या भूप्रदेशाची शान आहे. कोणत्याही मोसमात सह्याद्री आपल्याला भरभरूनच देतो. पावसाळ्यात तर या साऱ्याला बहर आलेला असतो. या दिवसांत उत्तुंग कड्यांवरून दरींत झेप घेणारे धबधबे म्हणजे प्रसन्न निसर्गाची जणू साक्षच!
बरं, हा सह्याद्रीचा भाग म्हणजे केवळ कोकण किनारपट्टी किंवा घाटमाथा नव्हे, तर ही सारी महाराष्ट्रभूमी.
अंधारबन - सह्याद्रीचे प्रातिनिधिक उदाहरण... नैसर्गिक विविधतेचा खजिना |
जगातल्या १० BIO-DIVERSITY HOTSPOT पैकी एक आणि म्हणूनच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात नाव आहे त्याचं.
BIO-DIVERSITY HOTSPOT म्हणजे इथे अनेक दुर्मिळ प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती यांच्या प्रजाती सापडतात. निसर्ग कितीतरी वेगवेगळ्या रूपात पाहता येतो, त्याचा प्रत्यय इथे भटकंती करताना अनेक वेळा येतो.
सह्याद्रीतली विविधता |
सिद्धगड किल्ल्याची भटकंती करताना अशीच एकदा शेकरू जातीची मोट्ठी खार झाडांच्या शेंड्यांवरून उडी मारून जाताना आम्ही पहिली होती. 'मादागास्कर' सिनेमातल्या किंग जुलिएनसारखीच ती इतकी चपळ होती की क्षणार्धात दिसेनासी झाली. ती फक्त याच भागात (भीमाशंकर अभयारण्य) पाहायला मिळते.
वेगवेगळ्या प्रकारची फुले पाहण्यासाठी कास पठार येथे गर्दी होते. महाराष्ट्रातले VALLEY of FLOWERS म्हणून कास पठार सध्या प्रसिद्ध झाले आहे. परंतु, सह्याद्रीच्या कोणत्याही डोंगरमाथ्यावर ऑक्टोबर, नोव्हेंबर दरम्यान गेल्यास,अशी फुलांची जत्रा हमखास पाहण्यास मिळते. त्यासोबत जर तुम्ही फुलपाखरांचे दर्दी असाल, तर निवांतपणे त्याचीही मजा घेता येते.
विविध पक्ष्यांची रेलचेलही आपल्याला महाराष्ट्रात पाहता येते. अनेक स्थलांतरीत पक्ष्यांचे येथे विविध मोसमात निवासस्थान असते. यंदा जानेवारीत कोकण बाइक टूर दरम्यान संगमेश्वर येथे शास्त्री नदीच्या किनाऱ्यावर एका धाब्यावर फक्त चहापानासाठी थांबलेलो असतानाच केवळ त्या वेळेत आम्ही १५ वेगवेगळे आजपर्यत न पाहिलेले पक्षी पाहिले होते. निसर्गाची हि किमया पाहताना अनेक वेळेला आपण थक्क होऊन जातो, वेळेचं भानही राहत नाही आणि कॅमेरा काढण्यासाठी वळावे, तर त्या दृश्यावरून नजरही वळवावीशी वाटत नाही.
अंजनेरीला मुक्कामाची जागा शोधताना पडक्या गोठ्याच्या भिंतीतल्या खिडकीपलीकडून पिवळसर रंगाचा साप सरसर जाताना पाहून जितकी भीती वाटली, तितकचं कुतुहुलही वाटलं होतं. त्याची ती सोनेरी पिवळसर कातडी इतकी सुंदर भासत होती की तो तिथून जाईपर्यंत त्याच्यावरची नजर बिलकुल ढळली नाही. पालघर हायवे वरून केळवेला बाईकने जाताना असाच अचानक अगदी समोरून लांबलचक साप रस्ता क्रॉस करून गेला, त्यावेळी करकचून दाबलेला ब्रेक आठवला की अजूनही अंगावर काटा उभा राहतो. नाणेघाटावर स्थित असलेले सुभाष भाऊ मागील बऱ्याच वर्षांपासून घराशेजारील बाजूच्या झाडावर असलेला हरणटोळ काठीने काढून आजही दाखवतात, जणू त्यांनी तो पाळलेलाच असावा.
सह्याद्रीत फिरताना बरीचशी विविधता जाणवते. प्राणी, पक्ष्यांचे विविध प्रकार तर आहेतच पण झाडे, वेली, फुले इतकंच काय पण कीटकांचेही विविध प्रकार आणि त्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात. आता तुम्ही या सर्वांचे अभ्यासक असाल तर गोष्ट वेगळीच, त्यांच्यासाठी इथे खजिनाच आहे; पण जरी नसाल, तरी या साऱ्यांचे निरीक्षण करणे म्हणजे आनंदाची वेगळी पर्वणीच असते. सह्याद्रीच्या अनेक ट्रेक मार्गांवर लाल रंगाचे कीटक दाटीवाटीने पहुडलेले दिसतात. हे कीटक आणि फांद्यांवर आलेले स्पायडर वेब्स अनेक नवख्या भटक्यांच्या कॅमेरात हमखास टिपले जातात.
नाणेघाटाच्या सुभाषभाऊंचा हरणटोळ |

पेणजवळील सांक्शीच्या किल्ल्यावरील एका झुडुपांत |
पावसाळ्यात या साऱ्यांना एक मोसमी बहर आलेला असतो. त्यावेळी हिरवागार शालू नेसून तयार झालेला हा निसर्ग मनात साठवावा तितका कमीच वाटतो. परंतु, संपूर्ण वर्षभर पुरेल इतका फ्रेशनेस तो मनाला देऊन जातो.
हरिश्चंद्रगडासारख्या लांबलचक ट्रेकला अनेकदा आपण धुक्यात हरवून जातो, कोथळीगडाच्या माथ्यावरून बाजूच्या डोंगरावर उतरणारे आणि क्षणात वर जाणारे ढग पाहण्याची मजा काही औरच असते.
नानाच्या अंगठ्यावर प्रचंड हवेच्या झोतात स्वतःला सावरणे आणि पुढेच असलेल्या जीवधनच्या पायथ्याला REVERSE WATERFALL चे मोतीरूप पाण्याचे थेंब अंगावर झेलणे ही किमया सह्याद्रीप्रेमींनाच माहीत असावी.
हे असे वाऱ्यासोबत मागे फिरणारे तुषार सह्याद्रीत दुर्मिळ ठिकाणी अनुभवता येत असले तरी कोसळत्या जलप्रपातांचे तुषार मात्र आपण संपूर्ण सह्याद्रीत कुठेही अनुभवू शकतो. अगदी मुंबईजवळच्या राष्ट्रीय उद्यान परिसरांत पावसाळ्यातल्या धबधब्यांपासून ते दूधसागरच्या प्रचंड मोठ्या जलप्रपातांपर्यंत असंख्य धबधबे सह्याद्रीत पाहता येतात. खास करून पावसाळ्यांत त्यांचे अवतरणे म्हणजे सह्याद्रीच्या हिरव्यागार पाचूसारख्या गर्द रानात काळ्या खडकांवरून शुभ्र ओघवत्या मोत्यांची रास वाहत असल्याचा भास होतो. त्याच्याकडे दुरून पाहताना किंवा त्यांचे तुषार अंगावर झेलताना त्या अवखळ पाण्यासोबत मनही आपोआप प्रवाही होतं.
परंतु, निसर्गाचा आस्वाद घेतानासुद्धा आपल्या मर्यादांचे भान असू द्यावे. निसर्ग जितका सुंदर तितकाच विलक्षण. म्हणून पदोपदी काळजी महत्वाची. रतनगड माथा फिरताना प्रचंड वाऱ्यामुळे गुडघ्यावर रांगत फिरावं लागलं होतं आणि अखेर नेढं न पाहता 'आल्या गुडघ्याने' गडफेरी पूर्ण न करताच गुहेत परतलो होतो. त्या वेळच्या निसर्गासमोर आम्ही अक्षरशः शरणागती पत्करली होती आणि तो योग्य निर्णय होता.
हरिश्चंद्रगडाकडे जाणारी धुक्यात लपलेली टोलार खिंड |
डोंगरावर ट्रेक करणारे ढगांचे पुंजके |
नानाच्या अंगठ्यावर प्रचंड हवेच्या झोतात स्वतःला सावरणे आणि पुढेच असलेल्या जीवधनच्या पायथ्याला REVERSE WATERFALL चे मोतीरूप पाण्याचे थेंब अंगावर झेलणे ही किमया सह्याद्रीप्रेमींनाच माहीत असावी.
जीवधन पायथ्याकडचा Fantacy tale मधला भासावा असा हा Reverse Waterfall चा सीन |
धबधब्यातून उलटे अंगावर येणारे मोती |
हे असे वाऱ्यासोबत मागे फिरणारे तुषार सह्याद्रीत दुर्मिळ ठिकाणी अनुभवता येत असले तरी कोसळत्या जलप्रपातांचे तुषार मात्र आपण संपूर्ण सह्याद्रीत कुठेही अनुभवू शकतो. अगदी मुंबईजवळच्या राष्ट्रीय उद्यान परिसरांत पावसाळ्यातल्या धबधब्यांपासून ते दूधसागरच्या प्रचंड मोठ्या जलप्रपातांपर्यंत असंख्य धबधबे सह्याद्रीत पाहता येतात. खास करून पावसाळ्यांत त्यांचे अवतरणे म्हणजे सह्याद्रीच्या हिरव्यागार पाचूसारख्या गर्द रानात काळ्या खडकांवरून शुभ्र ओघवत्या मोत्यांची रास वाहत असल्याचा भास होतो. त्याच्याकडे दुरून पाहताना किंवा त्यांचे तुषार अंगावर झेलताना त्या अवखळ पाण्यासोबत मनही आपोआप प्रवाही होतं.
निसर्गाच्या विविध रूपांत न्हाऊन घेताना |
परंतु, निसर्गाचा आस्वाद घेतानासुद्धा आपल्या मर्यादांचे भान असू द्यावे. निसर्ग जितका सुंदर तितकाच विलक्षण. म्हणून पदोपदी काळजी महत्वाची. रतनगड माथा फिरताना प्रचंड वाऱ्यामुळे गुडघ्यावर रांगत फिरावं लागलं होतं आणि अखेर नेढं न पाहता 'आल्या गुडघ्याने' गडफेरी पूर्ण न करताच गुहेत परतलो होतो. त्या वेळच्या निसर्गासमोर आम्ही अक्षरशः शरणागती पत्करली होती आणि तो योग्य निर्णय होता.
एखाद्या गडमाथ्यावरून सूर्योदय, सूर्यास्त पाहणे हा प्रत्येक वेळी अभूतपूर्व अनुभव असतो. रायगडाच्या होळीच्या माळावरून जगदीश्वर मंदिरापलीकडून होणारा सूर्योदय आणि त्या सूर्यप्रतापी मूर्तीपलीकडून कोवळ्या सूर्याचे पूर्णरूप अवतारताना पाहणे हा तो केवळ भाग्याचा सुवर्णक्षण.
होळीच्या माळावरून अनुभवलेला सूर्योदय |
|
साल्हेरसारख्या महाकाय किल्ल्यावरून पाहिलेले चंद्रग्रहण कदापिही विसरता येणार नाही. याच किल्ल्यावरून पहाटे जे निसर्गाचे दर्शन होते, त्यास खरंच सांगतो कुठेच तोड नाही...
सह्याद्रीचे हे सारे पर्वतही अतिशय विलक्षण आहेत. कोण्या एका शिल्पकाराने इतक्या साऱ्या डोंगरांनाही विविध आकार बहाल केले आहेत, असेच वाटते. सारेच वेगवेगळ्या आकाराचे. इतक्या भटकंतीत साम्य असणारे डोंगर आजपर्यंत तरी दिसले नाहीत. वरच्या चित्रांमध्येही ज्या छटा उमटल्या आहेत, त्यांच्या OUTLINES सुद्धा एकमेकांशी जुळत नाहीत. त्यातही निसर्गाची किमया अशी की इर्शाळगड, रतनगड सारख्या काही डोंगरांवर नेढं निर्माण झालंय, काळदुर्ग सारख्या काही डोंगरांचा टॉप सपाट मैदानी असल्यासारखा झालाय, तेलबैलाचा डाईक, पट्टा गडाच्या पायऱ्या, सांधनची प्रसिद्ध दरी, कोहोजवरील मानवाकृती सुळका, विशाळगडावरील नवरा-नवरीचे सुळके, इतरत्र असलेले वानरलिंगी सुळके.... सारं काही चकीत करणारं अन विस्मयकारक.
सह्याद्रीच्या पोतडीत अशी अनेक रत्ने आहेत, पण ती पाहण्यासाठी तुम्हाला सह्याद्रीचं व्हावं लागेल, त्याला आपलंस करावं लागेल. तिथे जाऊन निसर्गाचा आदर राखून, त्याला कोणतीही हानी न पोहोचवता, त्या निसर्गाशी, तेथे असलेल्या लोक-संस्कृतीशी आपल्याला एकरूप व्हावं लागेल.
एखाद्या गुरु प्रमाणे सह्याद्री प्रत्येक भटकंतीत आपल्याशी नवीन काहीतरी SHARE करत असतो, शिकवीत असतो. इथल्या भटकंतीत भूगोल, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र या विषयांचे सखोल ज्ञान तर मिळतेच शिवाय, भटकंती दरम्यान वेगळे संस्कार आपसूकच होतात. अनोळखी सहकाऱ्यांबरोबर मैत्री होते, मित्रांसोबत चांगली BONDING होते, कामं वाटली जातात, सहकार्य वाढते, व्यवस्थापनाचे मोठं-मोठाले शब्द जसे की, PLANNING, TEAM-WORK, LEADERSHIP, DECISION MAKING यांसारखी कौशल्ये आत्मसात करता येतात.
इथे करण्यासारखं खूप काही आहे - कळसूबाईच्या सर्वोच्च शिखरावरून आकाशाला गवसणी घालणं, कर्नाळासारख्या सुळक्यांवर पर्वतारोहण करणं, राजगड ते रायगड किंवा पन्हाळा ते विशाळगड सारख्या ऐतिहासिक वाटांवर RANGE TREK करणं इथपासून ते देवबागच्या खोल समुद्रात SCUBA DIVING करण्यापर्यंत या साऱ्यांतून आपण स्वतःला CHALLENGE करू शकतो.
सह्याद्रीत फिरताना गोविंदाग्रजांच्या ह्या ओळी सतत आठवत राहतात, किती चपखल गीत त्यांनी लिहिले आहे.
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा II
अशा ह्या महाराष्ट्रभूमीच्या निसर्गाला जोड मिळाली आहे ती इथल्या ऐतिहासिक वास्तूंची. सह्याद्रीतले आपले राज्य बळकट व सुरक्षित व्हावे, म्हणून इथल्या अनेक डोंगरांवर ऐतिहासिक कालखंडांत किल्ल्यांचा सरसाज चढवला गेला, अनेक घाटवाटा बनवल्या गेल्या. त्यामुळे, बऱ्याचशा सह्याद्री भटकंतीत प्रत्यक्ष इतिहासच आपल्याशी बोलू लागतो. महाराष्ट्राचा अगदी ख्रिस्तपूर्व २०० वर्षांपासूनचा ज्ञात इतिहास सह्याद्रीत आजही आपणांस पाहण्यास मिळतो. सह्याद्रीतल्या अनेक कातळात कोरलेल्या प्रचंड लेण्या, वेरूळसारखी मंदिरे, सातवाहनांनी बांधलेला नाणेघाट वा शिलाहार, यादव, राष्ट्रकूटांनी बांधलेले किल्ले वास्तूकलाप्रेमी संशोधक, संकलकांसाठी आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत.
१७व्या, १८व्या शतकांतला आपला इतिहास हा शौर्यगाथेचा परमोच्च कळस. आजही सह्य-वाटेतल्या प्रत्येक दगडांतून इतिहासाची ही कहाणी आपल्याला ऐकू येते - " सह्याद्रीतील खडतर वाटा, गाती शूर शिवबाच्या गाथा"
सह्याद्रीच्या अशा ऐतिहासिक वाटांबद्दल सविस्तर लिहिता येईलच, तूर्तास लिहिणे एवढेच की सह्याद्रीतली भटकंती ही कधीच केवळ भटकंती राहत नाही, त्याला जोड असते कौशल्यांची... इतिहासात डोकावण्याची, भूगोलाच्या वाटा धुंडाळण्याची, संघ-व्यवस्थापनाची, शारीरिक क्षमता वाढवण्याची आणि निसर्ग व लोक-संस्कृतीचा आदर करण्याची.
रंग नभी रंगले नवे, दश दिशाही बहरल्या, |
सूर्यास सुप्रभात करण्या, जणू साऱ्या सरसावल्या... |
सह्याद्रीचे हे सारे पर्वतही अतिशय विलक्षण आहेत. कोण्या एका शिल्पकाराने इतक्या साऱ्या डोंगरांनाही विविध आकार बहाल केले आहेत, असेच वाटते. सारेच वेगवेगळ्या आकाराचे. इतक्या भटकंतीत साम्य असणारे डोंगर आजपर्यंत तरी दिसले नाहीत. वरच्या चित्रांमध्येही ज्या छटा उमटल्या आहेत, त्यांच्या OUTLINES सुद्धा एकमेकांशी जुळत नाहीत. त्यातही निसर्गाची किमया अशी की इर्शाळगड, रतनगड सारख्या काही डोंगरांवर नेढं निर्माण झालंय, काळदुर्ग सारख्या काही डोंगरांचा टॉप सपाट मैदानी असल्यासारखा झालाय, तेलबैलाचा डाईक, पट्टा गडाच्या पायऱ्या, सांधनची प्रसिद्ध दरी, कोहोजवरील मानवाकृती सुळका, विशाळगडावरील नवरा-नवरीचे सुळके, इतरत्र असलेले वानरलिंगी सुळके.... सारं काही चकीत करणारं अन विस्मयकारक.
सह्याद्रीची विविध रूपे |
सह्याद्रीच्या पोतडीत अशी अनेक रत्ने आहेत, पण ती पाहण्यासाठी तुम्हाला सह्याद्रीचं व्हावं लागेल, त्याला आपलंस करावं लागेल. तिथे जाऊन निसर्गाचा आदर राखून, त्याला कोणतीही हानी न पोहोचवता, त्या निसर्गाशी, तेथे असलेल्या लोक-संस्कृतीशी आपल्याला एकरूप व्हावं लागेल.
एखाद्या गुरु प्रमाणे सह्याद्री प्रत्येक भटकंतीत आपल्याशी नवीन काहीतरी SHARE करत असतो, शिकवीत असतो. इथल्या भटकंतीत भूगोल, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र या विषयांचे सखोल ज्ञान तर मिळतेच शिवाय, भटकंती दरम्यान वेगळे संस्कार आपसूकच होतात. अनोळखी सहकाऱ्यांबरोबर मैत्री होते, मित्रांसोबत चांगली BONDING होते, कामं वाटली जातात, सहकार्य वाढते, व्यवस्थापनाचे मोठं-मोठाले शब्द जसे की, PLANNING, TEAM-WORK, LEADERSHIP, DECISION MAKING यांसारखी कौशल्ये आत्मसात करता येतात.
इथे करण्यासारखं खूप काही आहे - कळसूबाईच्या सर्वोच्च शिखरावरून आकाशाला गवसणी घालणं, कर्नाळासारख्या सुळक्यांवर पर्वतारोहण करणं, राजगड ते रायगड किंवा पन्हाळा ते विशाळगड सारख्या ऐतिहासिक वाटांवर RANGE TREK करणं इथपासून ते देवबागच्या खोल समुद्रात SCUBA DIVING करण्यापर्यंत या साऱ्यांतून आपण स्वतःला CHALLENGE करू शकतो.
सर्वोच्च (१) कळसुबाई शिखर, (२) साल्हेर- परशुराम मंदीर |
(१) पर्वतारोहण, (२) मुंब्रा डोंगरावरून RAPELLING, (३) डोंगर माथ्यावरून आकाशाला गवसणी घालताना, (४) SCUBA DIVING @ देवबाग |
सह्याद्रीत फिरताना गोविंदाग्रजांच्या ह्या ओळी सतत आठवत राहतात, किती चपखल गीत त्यांनी लिहिले आहे.
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा II
अशा ह्या महाराष्ट्रभूमीच्या निसर्गाला जोड मिळाली आहे ती इथल्या ऐतिहासिक वास्तूंची. सह्याद्रीतले आपले राज्य बळकट व सुरक्षित व्हावे, म्हणून इथल्या अनेक डोंगरांवर ऐतिहासिक कालखंडांत किल्ल्यांचा सरसाज चढवला गेला, अनेक घाटवाटा बनवल्या गेल्या. त्यामुळे, बऱ्याचशा सह्याद्री भटकंतीत प्रत्यक्ष इतिहासच आपल्याशी बोलू लागतो. महाराष्ट्राचा अगदी ख्रिस्तपूर्व २०० वर्षांपासूनचा ज्ञात इतिहास सह्याद्रीत आजही आपणांस पाहण्यास मिळतो. सह्याद्रीतल्या अनेक कातळात कोरलेल्या प्रचंड लेण्या, वेरूळसारखी मंदिरे, सातवाहनांनी बांधलेला नाणेघाट वा शिलाहार, यादव, राष्ट्रकूटांनी बांधलेले किल्ले वास्तूकलाप्रेमी संशोधक, संकलकांसाठी आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत.
(१) २००० वर्षांपूर्वी तंत्रकौशल्याने बनविलेला नाणेघाट, (२) लोहगड, (३) अजिंठा लेण्या |
१७व्या, १८व्या शतकांतला आपला इतिहास हा शौर्यगाथेचा परमोच्च कळस. आजही सह्य-वाटेतल्या प्रत्येक दगडांतून इतिहासाची ही कहाणी आपल्याला ऐकू येते - " सह्याद्रीतील खडतर वाटा, गाती शूर शिवबाच्या गाथा"
सह्याद्रीच्या अशा ऐतिहासिक वाटांबद्दल सविस्तर लिहिता येईलच, तूर्तास लिहिणे एवढेच की सह्याद्रीतली भटकंती ही कधीच केवळ भटकंती राहत नाही, त्याला जोड असते कौशल्यांची... इतिहासात डोकावण्याची, भूगोलाच्या वाटा धुंडाळण्याची, संघ-व्यवस्थापनाची, शारीरिक क्षमता वाढवण्याची आणि निसर्ग व लोक-संस्कृतीचा आदर करण्याची.
निसर्ग कैक वर्षांपासून इथे नांदतो आहे, इथला भौगोलिक परिसर लाखो वर्षांपूर्वी झालेल्या हालचालींमुळे घडलेला आहे आणि तेव्हापासून तो अबाधित आहे. म्हणून भटकंती करताना इथल्या निसर्गाचा समतोल बिघडणार नाही, त्यास कोणती हानी होणार नाही ना, याची पदोपदी काळजी घेण्यास हवी आणि त्यासाठी पुढील गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवाव्यात -
या गोष्टींचे योग्य पालन केल्यास आपण सह्याद्रीच्या निसर्गाचा मनसोक्त आनंद तर घेऊच पण निसर्गाचा समतोल राखून पुढील पिढीसाठी तो राखूनही ठेवू, जेणेकरुन तेही म्हणतील -
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा II
tags: trekking, Sahyadri, sunrise
- कुठेही कचरा करू नये
- गोंधळ घालून किंवा कर्कश्य आवाजात गाणी वाजवून निसर्गाची लय बिघडवू नये. त्याऐवजी पक्ष्यांचे गुंजारव, वाऱ्याचे झाडांसोबत होणारे संगीत ऐकावे.
- पाणी दिसले म्हणून उडी मारायचा मोह टाळावा.
- डोळे हे कोणत्याही कॅमेरापेक्षा जास्त resolution असलेले अवयव आहे. त्यामुळे अधिकाधिक निसर्ग डोळ्यांनी पाहून मनांत साठवण्याचा प्रयत्न करावा. फोटोग्राफी मर्यादित आणि सुरक्षित असावी. सेल्फी काढणे टाळावे.
- प्लास्टिक वापरणे टाळावे. असल्यास जितके नेले तितके सोबत घेऊन यावे.
- अनुभवी लोकांसमवेतच सह्याद्री सफर करावी. स्थानिक गावकर्यांचा आदर करावा.
- बिनदिक्कत सह्याद्री सफर करायची असल्यास ऋतूप्रमाणे योग्य पेहराव करावा.
सह्याद्रीतल्या अनेक ट्रेक मार्गांवर लावलेला सूचना फलक |
या गोष्टींचे योग्य पालन केल्यास आपण सह्याद्रीच्या निसर्गाचा मनसोक्त आनंद तर घेऊच पण निसर्गाचा समतोल राखून पुढील पिढीसाठी तो राखूनही ठेवू, जेणेकरुन तेही म्हणतील -
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा II
tags: trekking, Sahyadri, sunrise
खुपच सुंदर आहे अनुभव . 😍😍
उत्तर द्याहटवाखुप छान लिहिले आहेस निशांत.
उत्तर द्याहटवाFarach Chan lihile ashes, keep it up.
उत्तर द्याहटवाAtishay Sundar lihalay, Vachtana pratyaksh Anubhavat ahe asach vatal
उत्तर द्याहटवाखुपच छान आठवनी आज आठवल्या खरच खुप अभिमान वाटतो की आपण आपल्या सह्याद्रीला अनुभवू शकलो तेही इतक्या जवळून. ह्या सर्वात तुमच्या सारखे मित्र आम्हाला लाभले ज्यानी आम्हाला सह्याद्री नाही नुसता दाखवला तर तो समजावला खरच खुप खुप धन्यवाद.
उत्तर द्याहटवालेख खुप छान लिहिला आहे 😁
ही माहिती वाचून फारच छान वाटल.
उत्तर द्याहटवाया जागेला भेट देण्याच कुतूहल वाटतंय आता. इतक्या निसर्गरम्य ठिकाणी भेट देऊन नक्कीच मन शांत होईल आणि डोळे तृप्त होतील.
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाUseful post! Khup chan lihile..
उत्तर द्याहटवाज्या प्रकारे आपण सह्याद्री चे सुंदर असे वर्णन केले आहे त्याला तोड नाही.खुप सुंदर लेख आहे हा लेख वाचून मन प्रसन्नईत झाले आणि भरपूर चांगली माहिती मिळाली मला....
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाखुप सुंदर महिति दिली आहे. सह्याद्री
हटवाखुप छान लिहिले आहेस. थोडक्यात मोजकेच वाचताना कंटाळा नाही आला आणी pics पाहुन खरच तिथे जावेसे वाटते. अभिमान वाटतो तुझा की सह्याद्रीच्या रत्नासरखे एक रत्न आमच्या कुटुंबाचा एक भाग आहेस.
हटवाखूप सुंदर लिखाण आणि मनमोहक ठिकाण नेमली आहेत निशांत. - परेश कदम
उत्तर द्याहटवाआपल्या साऱ्यांच्या प्रतिक्रियांबद्दल फार आभारी आहे. अनेक वर्ष सह्याद्री आणि इतरत्र केलेल्या भटकंतीचा हा सारांश आहे. इथल्या निसर्गाचं हे थोडक्यात वर्णन आहे, इतिहास, कला-साहित्य याबाबतीतही आपला महाराष्ट्र वरचढ आहे.
उत्तर द्याहटवासध्या सह्याद्री व महाराष्ट्रातली भटकंती, तिथल्या भागाचा इतिहास, समृद्ध असलेली कला-साहित्य व लोक संस्कृती इतरांपर्यंत योग्यरित्या पोहोचवण्यासाठी अनेक छोट्या मोठ्या सफरींचे आयोजन करत आहोत. यादरम्यान आलेल्या अनुभवांना इथे शब्दबद्ध करण्याचा छोटासा परंतु सकारात्मक प्रयत्न करत आहे.
आपणही आपल्या नातेवाईकांस, मित्रपरिवारास याची ओळख करून द्या, जेणेकरून आपल्या लोकांना माहित नसलेल्या परंतु महाराष्ट्रातील समृद्ध अशा या खजिन्याची ओळख होईल. धन्यवाद - bhannatvara.