पोस्ट्स

कोजागिरीच्या निमित्ताने (Sagargad Part 2) ....

इमेज
आजवर कोणतेच मिशन अर्धवट केलेलं नाही. काही ना काही मार्ग निघतोच. याच आव्हानांनी बऱ्याच गोष्टी शिकवल्या. त्याचा उपयोग खऱ्या आयुष्यात, प्रोफेशनल आयुष्यात बऱ्याच वेळा झाला. आता पुन्हा तीच वेळ येऊन धडकली होती. निर्णय घ्यायचा होता. चढणीवर बाईक घालण्यात अर्थ नव्हता. साहस करावे, मूर्खपणा करू नये. याच मूर्खपणा पायी अनेकांनी नाहक जीव गमावले आणि आमचे अनेक डोंगर, किल्ले उगाच बदनाम झाले आहेत.   आलो तीच TECHNIQUE  वापरून चिखलवाट पार केली. रस्त्याकडेला पहिलं घर लागेल तिथे विचारपूस करायचं ठरलं. काहीच अंतरावर २ गावकरी दिसले आणि हायसं वाटलं. विचारपूस केल्यावर कळलं की जिथे आम्ही उभे होतो तिथूनच सागरगडचा ट्रेक सुरु होतो. परंतु, बाईक लावायला योग्य जागा बघा अन्यथा पेट्रोल चोरी होईल असं बोलून ते गडाच्या दिशेने निघाले. आता पुन्हा एक पंचाईत. अखेरीस पुढे कुंपणाच्या आत एका घरात पराग आणि वेदांत चौकशी करण्यासाठी गेले, ते घरमालकाला घेऊनच सोबत आले. त्या काकांनी अगदी अदबीने कुंपणावरचे बांबू बाजूस करून आम्हाला व बाइक्सना घराच्या अंगणात थारा दिला. उरण पासूनची रपेट आणि दगडधोंड्यातून कसरत करून आमचे पार अवसान गळाले होते.

कोजागिरीच्या निमित्ताने (Sagargad Part 1) ....

इमेज
 बरेच दिवस मनात रुंजी घालणारा सागरगड यंदा करायचाच असं ठरवलं होतं खरं, पण न संपणारा LOCKDOWN  काही मोठं प्लॅन करूच देत नव्हता. तरी अखेरीस कोजागिरीचं निमित्त साधून ट्रेकचा बेत आखला. सुरुवातीलाच आम्ही ४ जण पक्के झालो होतो. संध्याकाळच्या वेळी ट्रेक करून रात्री गडमाथ्यावर चंद्रप्रकाशात  (FULL MOON) मस्त मसाला दूध बनवून प्यायचा असा कोजागिरी साजरा करायचा प्लॅन केला होता. बऱ्याच जणांना MESSAGES, PINGS, UPLOADS करून सुद्धा अपेक्षेनुसार कोणतीही बेरीज, वजाबाकी न होता, आम्हीच ४ जणांनी जायचं ठरवलं. कोजागिरीचा दिवस चुकवायचा नव्हता. कारण  चाळीतलं घर सोडल्यापासून कोजागिरी कधी साजरी केलीच नव्हती.  ४ जण असल्यामुळे बाईकने जायचा प्लॅन केला. या इव्हेंटला थोडा अधिक तडका देण्यासाठी म्हणून भाऊच्या धक्क्यावरून FERRY मध्ये बाईक्स टाकून रेवसला जायच ठरवलं. सगळा जामानिमा गोळा करून कोजागिरीच्या संध्याकाळी ३.३० च्या आसपास भाऊच्या धक्क्यावर पोहोचलो. परंतु तिथे पोहोचल्यावर कळलं की  रेवसला जेट्टीचं काम चालू असल्यामुळे तिथे जाणारी फेरी बंद आहे. झालं... सागरगड ट्रेकच्या आव्हानांची सुरुवात इथे सुरुवातीलाच झाली. आता समोर २

उत्तनच्या किनाऱ्यावर...

इमेज
बऱ्याच दिवसांच्या LOCKDOWN  मुळे बोजड होऊन बसलेल्या शरीराला चालना द्यायची वेळ आली होती. मनोमनी अनेक योजना तयार होत होत्या, परंतु सरकारच्या सतत बदलणाऱ्या योजनांपुढे आमच्या योजनाही LOCKDOWN  होत होत्या. निसर्ग बहराचा आणि ट्रेकिंगचा ऐन हंगाम असलेला मान्सून खिडकीतून पाहण्यातच  निघून गेला. खरं पाहता ते आवश्यकच होतं. स्वतःची व पर्यायाने इतरांची सुरक्षा यालाच ट्रेकरचं मुख्य प्राधान्य असावं.  सप्टेंबरच्या दुसऱ्या रविवारी मात्र अगदी जवळच्या ठिकाणी भटकायचं ठरलं. त्यासाठी DWELLING SAHYADRI च्या आम्ही ५ जणांनी उत्तन येथे बाइकस्वारी करायचं ठरवलं. सुरक्षिततेची सर्व आयुधं परिधान (हेल्मेट, मास्क, ग्लोव्हज)  करूनच बाहेर पडलो.   भाईंदरमार्गे उत्तनचा रस्ता पकडला. मळभट असल्याने उदासीन वातावरण होते; तरी खूप दिवसांनंतर शहराबाहेर आल्यामुळे उत्साही वाटत होते, वाऱ्याची साथसंगत आणि हलक्या पावसाचा शिडकावा सोबत होताच. मुर्धा, राय, मोर्वा, धारावी (हो, इथेही धारावी नावाचे गाव आहे) अशी कोळी वस्ती असलेली गावे पार करून पाली व उत्तनच्या सीमेवर पोहोचलो. एका डोंगरावरून तीव्र उतारावरून बाईक वेग घेऊ लागली आणि समोरील नजाऱ्य

भीमाशंकरायण

इमेज
ही सफर सह्याद्रीतल्या सर्वांत मोठ्या खजिन्याची आहे. जवळपास २००६-०७ सालातील. त्यावेळी आत्तासारखे  व्यावसायिक ट्रेकिंगचे पेव  फुटले नव्हते. स्मार्टफोन्स नसल्यामुळे फोटोपुरते ट्रेकिंग होत नव्हते. गर्दी बिलकुल नव्हती. त्यामुळे व्यवस्थित आणि आहे त्या रूपात निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येत होता. ह्या ट्रेकनंतर लगेचच कॉलेजच्या ANNUAL MAGAZINE साठी केलेलं हे शब्दांकन. जुलै महिना उजाडला. यंदाची पावसाळी ट्रेकिंग नक्की झाली आणि भीमाशंकरला येण्यासाठी आम्ही बस्ता तयार केला. भीमाशंकर म्हणजे फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण भारतातील ट्रेकिंग प्रेमींचा आवडता ट्रेक पॉईंट. धार्मिकदृष्टया एक तीर्थक्षेत्र. आपल्या देशातल्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग. भीमासारख्या पवित्र नदीचे उगमस्थान. तर वैज्ञानिक, भौगोलिकदृष्ट्या जैविक विविधतेचे अतिशय महत्वाचे ठिकाण. घनदाट जंगलाने वेढलेले, उंच डोंगरावर वसलेले, अनेक ओढी-झरे असलेले हे निसर्गाचे माहेरघरच जणू! असे बरेच दिवस वाचनात असलेले भीमाशंकर ट्रेकिंगच्या माध्यमातून भेट देण्याचा दिवस उजाडला. दादरवरून कर्जतला जाणारी शेवटची लोकल पकडली. पहाटे ठीक ३.१५ व

तांदुळवाडीवरचा बार्बेक्यू

इमेज
ठरलेल्या ट्रेनने आणि ठरलेल्या वेळी सफ़ाळेला सर्वांची गाठभेट झाली. स्टेशन परिसरांत योग्य त्या जिन्नसा घेऊन आमची १० जणांची तुकडी पाटील दादांच्या जीप जवळ आलो. जून महिन्यांतला पाहिला शनिवार आणि कलतीचं  उन असल्याने वातावरणांत उकाडा जाणवत होता. ७-८ किमीचं अंतर असलं तरी फक्त ५ मिनिटांत तांदुळवाडी येईल, असं बोलून पाटीलभाऊंनी आधीच्या पॅसेंजरांसोबत आम्हाला कसंबसं कोंबून बसवलं. १५-२० मिनिटांचा तो प्रवास चांगलाच कसरतीचा पण तितकाच गंमतीचाही झाला. तांदुळवाडी गावात पोहोचल्यावर 'मुख्य जिन्नस' घेण्यासाठी परत अर्धा किमी मागे जावं लागलं, त्यात आणखी अर्धा तास गेला. गावातल्या दिलीपभाऊंच्या घरातून यथायोग्य पाण्याची कुमक घेऊन आमची तुकडी संध्याकाळी ६.४५ वाजता दुर्ग चढणीच्या वाटेस लागली. गावातून दिसणारा तांदुळवाडीचा डोंगर तांदुळवाडीच्या वाटेवर  १० मिनिटांतच खडा चढ सुरु झाला आणि शरीरासोबत मानसिकतेचा कस लागणार याची जाणीव झाली. कारण ग्रुपमधील सारेच जण आज बऱ्याच दिवसांनी ट्रेकला आले होते. त्यात उकाड्याचे दिवस, सोबत CAMPING च्या उद्देश्याने सामान व पाण्याचेही वजन होते. आता सूर्य मावळून अं